- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : राष्ट्रवादी युवती कांग्रेस नागपूर शहर तर्फे गरीब गरजू व निराधार लोकांना ब्लैंकेट वितरित

राष्ट्रवादी युवती कांग्रेस नागपूर शहर तर्फे गरीब गरजू व निराधार लोकांना ब्लैंकेट वितरित

नागपूर समाचार : नागपूर शहरात थंडीची लाट बघता रस्त्यावर राहणाऱ्या गरीब गरजू व निराधार लोकांना राष्ट्रवादी युवती काँग्रेस नागपूर शहर तर्फे नागपूर शहराच्या विविध भागात रस्त्यावर फिरून ब्लँकेटचे वितरण केले.

माणुसकीच्या नात्याने सीताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल सबनीस सर यांनी सुध्दा ब्लँकेट देऊन या कार्यात बहुमूल्य योगदान दिले. या करिता राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांनी सबनीस सर यांचे आभार सुद्धा मानले.

ब्लँकेट वितरणाच्या वेळी नागपूर शहर युवती अध्यक्ष पूनम रेवतकर सह मध्य नागपूर युवती अध्यक्ष बबिता मांडवकर , धनश्री बावणे, कविता नैताम, पूजा रेवतकर, धनश्री मेश्राम, बरखा मांडवकर, विधी सोनोले , निकिता भोयर व राष्ट्रवादी नागपूर शहर मुख्य प्रवक्ता नूतन ताई रेवतकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *