- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपूर समाचार : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नागपूर समाचार : नागपूर जवळच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या भारकस गावात भटक्या कुत्र्यांनी चार वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकीलचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील जवळील भारकस गावात घडली आहे. अंजली रावत असे मृत मुलीचे नाव आहे.

भारकस हे गाव नागपूर शहरालगत आहे. या गावात गेल्या अनेक महिन्यांपासून भटके कुत्रे आणि डुकरांचा प्रचंड दहशत आहे. अंजलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. अंजलीच्या मृत्यूनंतर या गावातील छोटे चिमुकले एकटे घराबाहेर पडण्याची हिम्मतदेखील करत नाहीत. भारकस गावात राहणारे रामसदोदर कुटुंबासह राहतात. त्यांची चार वर्षांची मुलगी अंजली घरासमोर खेळत असताना दगडाची ठेच लागून ती खाली पडली. ती खाली कोसळतात एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर आणखी दोन कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. तिन्ही कुत्र्यांनी तिला कंबर, पाठी आणि पायांवर चावे घेत अक्षरशः तिचे लचके तोडले.

शेजाऱ्यांना अंजलीचा किंचाळण्याचा आवाज गेल्यानंतर काही महिला धावल्या आणि अंजलीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. गावकऱ्यांनी अंजलीला जवळच्या टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्याठिकाणी उपचार केल्यानंतर पुढचा उपचार शक्य नव्हते. तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात अंजलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारकस गावात शोककळा पसरली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *