- Breaking News, नागपुर समाचार, स्वास्थ 

नागपुर समाचार : इतवारी येथे निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

इतवारी येथे निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेतर्फे आणि श्री तारण-तारण दिगंबर  जैन समाज यांच्या सहकार्याने महापौर नेत्रज्योती योजनेअंतर्गत रविवारी (ता. १५) इतवारी येथील तारण-तरण दिगंबर मंदिर लाला बाडा येथे निःशुल्क नेत्र तपासणी व मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील ६१ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराचे उदघाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार विकास कुंभारे, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कान्हेरे, सारला नायक, माजी स्थायी समिती सभापती रवींद्र पैगवार, सामाजिक कार्यकर्ते किशोर पालांदूरकर आदी उपस्थित होते.

शिबिरामध्ये महात्मे नेत्रपेढीच्या सहकार्याने नि:शुल्क नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणीनंतर मोतिबिंदू शस्त्रक्रियेबाबत सल्ला देण्यात आला. शस्त्रक्रियेची गरज असलेल्यांची महात्मे नेत्रपेढी येथे नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये महात्मे नेत्रपेढीच्या डॉक्टर्स आणि अन्य वैद्यकीय चमूद्वारे परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.

नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेतर्फे ७५ नेत्र तपासणी शिबीर, ७५ दंत तपासणी शिबीर आणि १०७ आरोग्य तपासणी शिबीर आशा एकूण २५७ शिबिराचे आयोजन शहरातील विविध भागात करण्यात येत आहे, या सर्व शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

यावेळी सतीश पेंढारी जैन, विक्रांत जैन, संजय टक्कामोरे, पंकज बोहरा, प्रशांत मानेकर, महेन्द्र टक्कामोरे, संतोष जैन, सुनिल जैन, मुन्ना लखेटे, राजेश कन्हेरे, कमलेश नायक, प्रमोद जैन, अनुराग जैन, शिव चौरीया आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय टक्कामोरे, सोनु जैन, रूपेश टक्कामोरे, हितेश जैन, लोकेश टक्कामोरे, योगेश जैन, सम्यक जैन, संस्कार टक्कामोरे, ऋषी जैन यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अजय टक्कामोरे यांनी तर आभार संतोष जैन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.