- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : : प. पू. सद्गुरूदास महाराजांच्‍या वाढदिवसानिमित्‍त रक्‍तदान महायज्ञ 

प. पू. सद्गुरूदास महाराजांच्‍या वाढदिवसानिमित्‍त रक्‍तदान महायज्ञ 

नागपूर समाचार: रक्‍तदान हे सर्वश्रेष्‍ठ दान असल्‍याचे म्‍हटले जाते. एका सुदृढ व्‍यक्‍तीने रक्‍तदान केल्‍यास तीन रुग्‍णांचे प्राण एकाचवेळी वाचवता येतात. समाजात थॅलेसेमिया, ल्‍युकिमिया, हीमोफिलिया सारख्‍या विकारांनी ग्रस्‍त लाखो लोक असून त्‍यात अपघातामुळे अतिरक्‍तस्‍त्राव झालेल्‍या रुग्‍णांचीही भर पडत असते. अशा रुग्‍णांना तातडीने रक्‍त देण्‍याची गरज असते. 

प. पू. सद्गुरूदास महाराज यांचे शिवकार्य, धार्मिक आणि सामाजिक कार्य सर्वश्रुतच आहे. महाराजांचा 81 वाढदिवस येत्‍या 28 जानेवारी रोजी असून त्‍यानिमित्‍त सामाजिक बांधिलकीच्‍या भावनेतून भव्‍य रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. प. पू. विष्‍णुदास महाराज अध्‍यात्‍म साधना केंद्र, छत्रपती सेवा प्रतिष्‍ठान, पत्रभेट परिवार आणि डॉ. हेडगेवार रक्‍तपेढी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने येत्‍या, 28 जानेवारी रोजी सावरकर सभागृहात सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा रक्‍तदान महायज्ञ होणार आहे. 

नियमित रक्‍तदान केल्‍याने हृदयाचे आरोग्‍य सुधारते, लाल रक्‍तपेशींमध्‍ये वाढ होते, वजन घटते, कॅन्‍सरचा धोका कमी होतो, रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते, नवीन रक्‍त तयार होते शिवाय लिव्‍हरचे कार्य सुधारते. त्‍यामुळे रक्‍तदात्‍यांनी पुढे यावे आणि पुण्‍यकार्यात सहभागी होऊन जास्‍तीत जास्‍त संख्‍येने रक्‍तदान करावे. कोरोनाच्‍या सरकारी निर्बंधाच्‍या अधीन राहूनच हे शिबिर संपन्‍न होणार आहे. या रक्‍तदान महायज्ञात सहभागी होण्‍यासाठी व नावे नोंदणीसाठी 9422991621, 9325378453 व 9922788848 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *