
विद्यापीठच्या इमारतमध्ये बुस्टर डोज लसीकरण सुरु
नागपूर समाचार ता. १० : वाढत्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता इंदिरा गांधी रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान सुरु आहे.इंदिरा गांधी रुग्णालय येथे पहिला डोज,दूसरा डोज,बूस्टर डोज व १५ ते १८ वयोगटातील लसिकरण यामुळे जागा अपुरी पडून अतिशय गर्दी वाढली होती.
शया समस्येला गंभीरपणे लक्षात घेता नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांच्या पुढाकाराने आई.जी.आर रुग्णालय समोरील नागपुर विद्यापीठचे Gandhian Thought हा सभागृह पहिला व दूसरा डोज तसेच बूस्टर डोज करिता उपलब्ध करून दिला.
या ठिकाणी आज लसिकरणाचा पहिला दिवस असून याचे उद्घाटन सोमवारी मा.महापौर श्री.दयाशंकर तिवारी, कुलगुरु श्री.संजय दुधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर यांच्या महापौर कालावधीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नगरसेविका डॉ. परिणीता फुके यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक श्री. अमर बागड़े, नगरसेविका सौ. रूतिकाताई मसराम, श्री.रवी वाघमारे,श्री.विजय होले,श्री.विजय चौरे,श्री.राम भाऊ मुंजे,श्री.योगेश मसराम, श्री. गूंडुभाऊ मसूरकर, श्री.भागवत पांडे तसेच इंदिरा गांधी रुग्णालय येथील सर्व डॉक्टर्स व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.