- Breaking News, कोविड-19

नागपूर समाचार : नागपुरात २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट, आज ४०४ नवे रुग्ण

नागपुरात २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट, आज ४०४ नवे रुग्ण

नागपूर समाचार : नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवास्त झाली असल्याचे चित्र आहेत. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होताना दिसत आहे, काल १९६ रुग्णांची नोंद झाली असताना आज अवघ्या २४ तासात रुग्णांची संख्या दुपटीने वाढलेली दिसून येत आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात ४०४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनावरील ताण बराच वाढणार असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासात नागपुरात ४०४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या आता ४९४९२६ वर पोहोचली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये ३२९ रुग्ण शहरातील, ४९ ग्रामीण भागातील तर २६ जिल्ह्याबाहेरील रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज शहरात एकूण ८१०७ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील २८८६ चाचण्या ग्रामीण भागात तर ५२२१ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत.

रुग्णसंख्या दुपटीने वाढत असली तरीही शहरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आजही नोंद नाही, त्यामुळे शहरातील नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. शहरातील कोरोना रुग्णांची मृत्युसंख्या १०१२३ वर कायम आहे. आज २४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४८३७२७ वर पोहोचली आहे तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९७.७४ टक्क्यांवर पोहोचले आहे. शहरात सध्या १०७६ सक्रिय रुग्णांची नोंद असून त्यातील १२६ रुग्ण ग्रामीण भागातील तर ९०६ रुग्ण शहरातील तर ४४ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *