- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : सावित्रीबाई फुले जयंती

सावित्रीबाई फुले जयंती

नागपूर समाचार : ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि भारतीय आदिम जाती सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर होते. 

प्रमुख अतिथी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या विदर्भ प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय, जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद खेकाळे, जिल्हा संघटक रेखा भोंगाडे, ग्रामीण अध्यक्ष स्वाती वंजारी, जिचकार, विशाखा भागडे आणि भारतीय आदिम जाती सेवा संघाच्या अधीक्षिका उषा मालवीय होत्या.

वर्षा तिवस्कर व रेखा धुमने यांनी ‘ मी सावित्री बोलतेय ‘ ही एकांकिका सादर केली. जिल्हा सचिव अर्चना पांडे यांनी आभार मानले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर जिल्ह्याचे कार्यकर्ते प्रशांत लांजेवार, ओमप्रकाश तिवारी, दिलीप डहाके, रेड्डी, कविता बोबडे, उज्ज्वला शहारे, ज्योती द्विवेदी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.