- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपुरात कोरोना बाधितांनी गाठली शंभरी, सोमवारी १०५ पॉझिटिव्ह

नागपुरात कोरोना बाधितांनी गाठली शंभरी, सोमवारी १०५ पॉझिटिव्ह

नागपूर समाचार : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात बाधितांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सोमवार ३ जानेवारी रोजी १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असतानाच नागपुरात १०५ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने प्रशासन काळजीत पडले आहे. रविवार २ जानेवारी रोजी ९० कोरोना बाधितांची नोंद झाली होती. यापूर्वी मंगळवार २८ डिसेंबर २०२१ रोजी ४४ पॉझिटिव्ह आढळले होते. तर शुक्रवार ३१ डिसेंबर २०२१ रोजी ८१ कोरोना बाधित आढळले होते.

सहा महिन्यां पासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या तीन आकडी येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. २३ डिसेंबर २०२१ पर्यत एक आकडी असलेली कोरोना बाधिताची संख्या २४ डिसेंबर २०२१ पासून सातत्याने वाढत आहे. निबंध घातल्या नंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *