
दारूच्या नशेत गोंधळ, हुल्लडबाजी करणाऱ्यांनो खबरदार, पोलीस आयुक्तांचा खणखणीत इशारा
नागपूर समाचार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. अशात कुणी दारूच्या नशेत गोंधळ घातला, हुल्लडबाजी केली किंवा निर्ढावलेपणा दाखवला तर त्याला नवीन वर्षांचे स्वागत पोलीस कोठडीतून करावे लागेल, असा ईशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी दिला.
यावेळी सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे उपस्थित होत्या.थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनच्या निमित्ताने जागोजागी पार्टीचे आयोजन केल्या जाते. अतिउत्साहाच्या भरात डीजे लावून नृत्याच्या नावाखाली धिंगाणा केला जातो.
गर्दीच्या ठिकाणी महिला-मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न होतो. त्यातून वाद वाढतात अन् नंतर हाणामारी किंवा प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडतात. दारूच्या नशेत अनेक जण गोंधळ घालतात. सुसाट वेगाने वाहने चालवून स्वतासोबत दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अपघात घडतात.