- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ, संत्रानगरी

मुंबई समाचार : राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच पार पडणार आहे

महाविकास आघाडीने एकमताने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई समाचार : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया यांमुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर गेले आहे. 

अधिवेशन येत्या डिसेंबर अखेरीस होणार आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशन प्रथा-परंपरेप्रमाणे नागपूरला होत असते, परंतु मुख्यमंत्र्यांची तब्येत लक्षात घेता हे अधिवेशन मुंबईतच होण्याची चिन्हे आहेत. लवकर या आठवड्यात तसा निर्णय सरकार व प्रशासन घेणार आहे. विशेष म्हणजे अधिवेशन नागपूरलाच व्हावे भाजपचे नेते आग्रही आहेत. तर दुसरीकडे हे अधिवेशन मुंबईतच व्हावे यासाठी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे.

जुलैमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२१ रोजी नागपूर येथे होईल, असे घोषित करण्यात आले होते. मात्र, नियोजित अधिवेशनाला 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अद्याप मंत्रालय पातळीवर अधिवेशनाच्या तयारीची हालचाल नाही. अधिवेशनाच्या महिनाभर आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होते. अधिवेशनाला जेमतेम 15 दिवस शिल्लक असताना सल्लागार समितीच्या बैठकीचा पत्ता नाही. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंना डिस्चार्ज अद्याप मिळालेलं नाही.त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांनी हे अधिवेशन मुंबईत घ्याव असं एकमताने ठरवलं आहे.

काय आहे प्रस्ताव ? 

या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे या हिवाळी अधिवेशनाचा प्रस्ताव बैठकी ठेवतील. यानंतर मुंबईत हे अधिवेशन व्हावं यावर चर्चा होणार. मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकार हे हिवाळी अधिवेशन १४ ते २४ , १७ ते २६ , २० ते २९ डिसेंम्बर या कालावधीत घेण्यासाठी प्रस्ताव ठेवणार आहे. नये बैठकीनंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि मग मुंबईतच या हिवाळी अधिवेशनाचा नियोजन करण्यात येईल.

गेल्या वर्षी देखील हे हिवाळी अधिवेशन मुंबईतच पार पडलं होतं. कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होता या कारणास्तव ते हिवाळी अधिवेशन मुंबईतच पार पडलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *