- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची उपद्रव शोध पथकाव्दारे तपासणी

शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची उपद्रव शोध पथकाव्दारे तपासणी

नागपुर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. १५ नोव्हेंबर) रोजी ०२ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २५,००० चा दंड वसूल केला. पथकाने २५ मंगल कार्यालय, १८ मंदीरे, ७ मस्जिद, २९ शाळा व कॉलेज आणि अन्य १२ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण ९१ स्थळांची तपासणी केली.

त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *