- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : अन्नक्षेत्र फाऊंडेशनचा झेंडा गीत गायन उपक्रम 

अन्नक्षेत्र फाऊंडेशनचा झेंडा गीत गायन उपक्रम 

नागपूर समाचार : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि झेंडा गीताचे रचयिता श्यामलाल गुप्त यांच्या जयंतीनिमित्त आज शहरातील अनेक भागांत सामूहिक झेंडा गीत गायन उपक्रम घेण्यात आला.

त्यात अन्नक्षेत्र फाऊंडेशन, हायजेनिक टॉयलेट मुव्हमेंट, वेणी फाऊंडेशन, निशिता बहुउद्देशीय संस्था, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि साहित्य विहार या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने लॉ कॉलेज चौकात झेंडा गीत गायन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अरुणा पुरोहित यांच्या नेतृत्वात सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गीत गायन केले आणि स्वातंत्र्याचा जल्लोष केला.

यावेळी शैलजा पिंगळे, सुप्रिया मंगरुळकर, दत्ता फडणवीस, नानासाहेब समर्थ, डॉ. विनोद अलोणी, अण्णाजी मुरकुटे, मधुकरराव पुरोहित, सचिन पुरोहित, दीपिका सिंग, वर्षा मिलमिले, माला बारापात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमानंतर सर्व सहभागींना फळांचा रस आणि पौष्टिक खाद्यपदार्थ वितरित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *