- नागपुर समाचार, मनपा

सेवा सप्ताह अंतर्गत प्रभाग 34 मध्ये मोफत आरोग्य शिबीर

नागपूर:- भारत देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा सप्ताह म्हणून भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 34 (ड) व नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागा तर्फे मोफत आरोग्य शिबीर शुक्रवार दि. 24 सप्टेंबर रोजी, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

             प्लॉट नंबर 54 कल्यानेश्वर नगर, मानेवाडा बेसा रोड नागपूर. येथे हे शिबिर घेण्यात येईल. मोफत आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी मोतिया बिंदू ऑपरेशन, एक्स-रे, चेस्ट स्कॅनिंग, मलेरिया टेस्ट, शुगर मधुमेह, बी.पी., जनरल फिजीशीयन मोफत औषधे, कोरोना लसीकरण, कोरोना टेस्ट, RT- PCR यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. करिता प्रभाग 34 मधील वस्तीतील नागरिकांनी व जनतेने या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा नगरसेविका सौ. मंगला खेकरे यांच्यातर्फे असे आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *