- मनपा

सदरमधील शितला माता मंदिर परिसरात आरोग्य शिबिर

नागपूर, ता. २० : शहरातील धरमपेठ झोन अंतर्गत सदर येथील शितला माता मंदिर परिसरामध्ये मनपाच्या वतीने सोमवारी (ता.२०) आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्धाटन झाले.

            यावेळी माजी आमदार सुधाकर देशमुख, आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेविका प्रगती पाटील, शिल्पा धोटे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, झोनल आरोग्य अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे आदी उपस्थित होते.

            आरोग्य शिबिरात बालक, महिला, ज्येष्ठ नागरिक, कर्करोग परीक्षण, क्षयरोग परीक्षण, एक्स रे, रक्त तपासणी, एलएफटी, केएफटी, लिपिड प्रोफाइल आदी तपासण्या करून औषध वितरणही करण्यात आले.

            यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचावी यासाठी शहराचा प्रथम नागरिक म्हणून प्रयत्नशील आहे. शहरातील ज्या भागात जवळपास आरोग्य सुविधा उपलब्ध नाही अशा ७५ ठिकाणी मनपाद्वारे ‘वंदे मातरम् हेल्थ पोस्ट’ तयार करण्याचे कार्य सुरू आहे. याच श्रृंखलेमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी होउन त्यांना आवश्यक ते औषधोपचार मिळावे यासाठी शहरात १७० आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने विविध भागामध्ये मनपाद्वारे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या शिबिरांचा शहरातील बहुतांशी नागरिकांना फायदा होत असल्याचे समाधान आहे, असेही ते म्हणाले.

            महात्मे नेत्र पेढीच्या सहकार्याने महापौर दृष्टी सुधार योजना, महापौर नेत्रज्योती योजना याअंतर्गत तिरळेपणा, मोतीबिंदू आदींचे उपचार नि:शुल्क केले जात आहे. यासोबतच आता शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने दंत तपासणी शिबिरही सुरू करण्यात आले आहे. शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असून नागरिकांनी मनपाच्या या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *