- नागपुर समाचार

आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी बसपा कटीबद्ध! समाजावर होणार्या अन्यायाविरोधात वाचा फोडू-अँड.संदीप ताजने

मुंबई, ८ सप्टेंबर:- पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आहे. पंरतु,आतापर्यंतच्या सरकारांनी या जिल्ह्याच्या विकासाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. राज्यात आणि पालघर मधील स्थानिक स्वराज्य संस्थेत बहुजन समाज पार्टीला सत्ता दिली तर,आदिवासी समाजासह पीडित,शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बसपाकडून केले जाईल, असा शब्द बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी आज, बुधवारी पालघर येथील टीमा हॉल, टाकीनाका येथे आयोजित ‘संवाद यात्रे’च्या सभेतून दिला. यावेळी प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना तसेच राज्याचे महासचिव प्रा.प्रशांत इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालघर मधील वसई- विरार महानगर पालिका निवडणुकीत बसपनाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. वॉर्डनिहाय रचना त्यामुळे कार्यान्वित करण्याच्या सूचना यावेळी अँड.ताजने यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. महानगर पालिकेची निवडणुकीत बसपा सर्व ताकदीनिशी लढवणार असून यंदा पालिकेवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याचे ते म्हणाले. पालघर मध्ये अनेक आघाड्या झाल्या. अशीच एक आघाडी सध्या इथे कार्यरत आहे. पंरतु, आदिवासी बांधवांसह सर्वसमावेश विकासाऐवजी स्वत:ची राजकीय पोळ्या भाजून ‘अपना विकास’ करण्यात या आघाड्या गुंतल्या असल्याचा आरोप देखील यावेळी ताजने यांनी केला.

मा.बहन मायावती जी यांच्या मार्गदर्शनात आणि युवा नेतृत्व आकाश आनंदजी यांच्या नेतृत्वात राज्यातही पार्टीची आगेकूच सुरू आहे. याच धर्तीवर सर्वसामान्यांनी बसपाला साथ दिली तर, पालघर जिल्ह्याचा विकास करू,अशी ग्वाही त्यांनी यानिमित्ताने दिली. राष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईच्या शेजारी असून देखील पालघरचा विकास झालेला नाही. पंरतु, बसपाला एकहाती सत्ता मिळाली तर हा विकास दृष्टिपथात येईल, असेही अँड.ताजने म्हणाले. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सुरेश महाडिक, जिल्हा प्रभारी प्रा.धम्मशील खरे, राजेंद्र करोतीया,अजय जाधव, मुख्तार खान, निरज शर्मा, नैन इब्रिसी, सतिश लोखंडे, सायली राउत, सुषमा ताई, मुकेश जाधव, दत्ता पाडोसा याच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून  उस्फुर्त प्रतिसाद दिला.

शेवटच्या नागरिकांपर्यंत विकासगंगा पोहचणार-प्रमोद रैना
पालघर असो वा राज्यातील इतर मागास जिल्हे, बसपाच्या नेतृत्वात शेवटच्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाईल,असे प्रतिपादन राज्य प्रभारी प्रमोद रैना यांनी केले. मा.बहन जींच्या मार्गदर्शनावर पीडित, शोषितांसह ब्राम्हण वर्गालाही विश्वास आहे. उत्तर प्रदेशात झालेले प्रबुद्ध विचार संगोष्टीत झालेले ब्राम्हण बांधवांच्या गर्दीवरून बहनजी वर असलेला त्यांचा अतुट विश्वास अधोरेखित होतो.अशात पुरोगामी महाराष्ट्रातही सर्वसमावेश विकासासाठी ‘बसपा’च पर्याय असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *