- नागपुर समाचार

राणेंना अटक, सत्तेचा माज : आ.कृष्णा खोपडे मुख्यमंत्र्यांना हवा सन्मान, मग केंद्रीय मंत्र्यांना कां नाही ?

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नारायण राणे यांना केलेली अटक म्हणजे केवळ आणि केवळ सत्तेचा माज आहे. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर डिंगा हाकणारी कॉंग्रेस यावर गप्प कां? स्वत:ला चाणक्य म्हणवून घेणारे पवार साहेब यावर गप्प कां? मुख्यमंत्री महोदयांना सन्मान हवा, तर मग केंद्रीय मंत्र्यांना का नाही? यापूर्वी मुख्यमंत्री यांच्या विरुद्ध भाष्य केल्यावर पत्रकारांना अटक करणे, माजी सैनिकांना मारहाण करणे, ही शिवाजी महाराजांची शिकवण नाहीच. मग हे कसले शिवसैनिक, स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेतांना लाज कशी वाटत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार कृष्णा खोपडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर दिली.   

      आमदार कृष्णा खोपडे यांचे मार्गदर्शनाखाली पूर्व नागपूर भा.ज.प.चे नगर सेवक व युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी सतरंजीपुरा चौक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटो जाळून या घटनेचा जाहीर निषेध केला. या जाहीर निषेध कार्यक्रमात उपमहापौर मनिषा धावडे, नगरसेवक प्रदीप पोहाणे, मनिषा कोठे, सरिता कावरे, हरीश दिकोंडवार, मनिषा अतकरे, राजकुमार साहू, दिपक वाडीभस्मे, अनिल गेंडरे, वैशाली वैद्य, जयश्री रारोकर, शहर युवा महामंत्री सचिन करारे, सन्नी राऊत, रोहित खोपडे, बाळा वानखेडे, विनोद बांगडे, प्रशांत सोनारघरे, राजू गोतमारे, सेतराम सेलोकर, जे.पी.शर्मा, घनश्याम ढाले, शेख एजाज, गुड्डू पांडे, पिंटू पटेल, तुषार ठाकरे, राजेश ठाकूर, गोविंदा काटेकर, विकास रहांगडाले, नितीन इटनकर, विक्की कळमकर, मुरलीधर वडे, विवेक ठवकर, संजय मानकर, गजानन देशलहरे, आशिष मेहर, अनु यादव व अनेक युवा कार्यकर्ता उपस्थित होते.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *