समाज बांधवानी आण्णाभाऊं साठे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य करावे -डॉ अशोक ओळंबे
अकोला-स्व जयप्रकाश नारायण चौक येथे लोकशाहीर, साहित्यरत्न,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली,
शाळेत एक दिवस दाखल झालेल्या अण्णाभाऊंना दुसऱ्या दिवशीच शाळा सोडावी लागली, खेड्यातील आठरविश्व दारिद्र,जीवन जगण्यासाठी लागणारी साधनांची चनचन,जात दांडग्यांचा राबता,जातीव्यवस्थेचे हिनत्व यामुळे त्यांचे वडिलांना त्यांचे लहानपणीच गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला मुंबई आल्यानंतर त्यांनी खूप काबाडकष्ट घेतले कोळसा भरणे,कामगारांची पत्रे पोहचविणे,तमाशात नाचणे,फेरीवाल्यासोबत फिरत दुकानांच्या पाट्या वाचून त्यांनी अक्षर ज्ञान आत्मसात केले,शिवाजी महाराजांचा पोवाडा,स्टालिनग्राडचा पोवाडा,अनेक कादंबऱ्या,गोष्टीची पुस्तके,तमाशे,अनेक शाहिरी गाणी,आपल्या साहित्यातून,जगण्यासाठी लढणारा, व्यवस्थेने छळलेला,जातीव्यस्थेने पिळलेला माणूस उभा केला,झुंजार कथाकार,सिद्धहस्तक लेखक,कवी, शाहिर नाटककार,असले तरी,त्यांचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी होते आयुष्याच्या शेवटी आपली सम्पूर्ण कारकीर्द आणि साहित्य संपदा त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी अर्पण करतांना ते म्हणतात “जग बदल घालुनी घाव, मला सांगून गेले भीमराव” “गुलामगिरीच्या या चिखलात,रुतून बसला का ऐरावत” “अंग झाडूनी निघ बाहेरी,घे बिनीवरती धाव” अश्या महान कर्तृत्वान साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊंचे विचार समाजाने आत्मसात करून वाटचाल करण्याचे आव्हान यावेळी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते गणेश मानकर यांनी केले होते,कार्यक्रमाला प्रामुख्याने नगरसेवक हरीशभाई आलिंमचंदानी,प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र डॉ अशोक ओळंबे,डॉ संतोष धुरंधर,सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक गणेश पोलाखडे गणेश ठाकूर,संतोष चाटी उपस्थित होते यावेळी शैलेश इंगळे,गोपाल चव्हाण,कृष्णां मानकर,सागर बदने, गजानन खडसे,ज्ञानेश्वर पाटील,नामासेठ, कलानी,अक्षय देशमुख,हरिदास गुलवाडे, विकास हरसुले,, शाळीग्राम कांबळे,अमोल पोलाखडे,सुधाकर सदांशीव,अनिल चालले सुरेश मनवानी, अमित सदानी,नानक मनवानी यांचेसह समाजबांधवांची उपस्थिती होती.