- नागपुर समाचार

ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

*ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.*

मुंबई, दि. १४ जुलै 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बदलापूरचे विठ्ठल किणीकर, सुरेश पाटील, मनिषा पोळ, समर्थ लाड, अविनाश पाटील, रोहितकुमार प्रजापती, अनिता प्रजापती, रुपेश अंबेरकर, रतन कांबळे, मनिषा कांबळे, साक्षी दिवेकर, मिरजा आंबेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी टिळक भवन, दादर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रा. प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, प्रमोद मोरे, मा. आ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *