
नागपूर, ता.३० : नागपूर म.न.पा.सचिवालय (समिती) शाखेतील अधीक्षक दत्तात्रय डहाके हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल त्यांना एका छोटेखानी कार्यक्रमात निरोप देण्यात आला. स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, माजी स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके व निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी पुष्पगुच्छ, श्रीफळ व भेटवस्तु देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी प्रफुल्ल फरकासे, रिझवान खान, सुरेश शिवणकर, विलास धुर्वे, जयंत भोयर, श्याम माटे आदी उपस्थित होते.
श्री. डहाके यापूर्वी जकात, मालमत्ता कर, जलप्रदाय तसेच लेखा व वित्त विभागात कार्यरत होते.