- कोविड-19, नागपुर समाचार

कोरोनाची लक्षणे आढळताक्षणी वेळ न घालवता तात्काळ तपासणी करा

• कोविड टास्क फोर्सच्या सूचना
• अनलॉकच्या निर्बंधामध्येही लसीकरणाला प्राधान्य
• दोन लाखापेक्षाही जास्त लसीकरणाचे डोस उपलब्ध
• रेमडेसीव्हीरचा वापर काळजीपूर्वक आवश्यक
• जनतेने घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करावे

नागपूर समाचार : 15 एप्रिल, कोरोनाची परिस्थिती हाताळण्याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेतर्फे बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यकतेनुसार बेडच्या उपलब्धतेसाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे. ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करण्यासाठी भोपाळ, भिलाई तसेच इतर ठिकाणाहूनही प्रयत्न सुरु आहेत. जनतेने घाबरुन जाऊ नये व उपचाराला सहाकार्य करावे, असे आवाहन कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आज जनतेला केले आहे.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, कोविड टास्क फोर्सचे सदस्य, तज्ज्ञ डॉक्टर व माध्यम प्रतिनिधी यांच्यासोबत वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या संवादामध्ये कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. मिलिंद भ्रुशुंडी, डॉ. राजन बारोकर, डॉ. राजेश गोसावी व डॉ. निर्मल जयस्वाल सहभागी झाले होते. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेडची उपलब्धता, ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हीरसारख्या औषधांचा मर्यादित पुरवठा होत असल्यामुळे जनतेमध्ये काळजीचे वातावरण निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सच्या सदस्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचविण्याला प्रशासनाचे सर्वो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *