- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर : संत शिरोमणी गुरू रविदास आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव

राष्ट्रीय चर्मकार महासंघ नागपूर आणि संत रविदास छात्रालय संस्था हनुमाननगर नागपूर

नागपुर : आज शुक्रवार दिनांक 19:02:2020 ला सकाळी 11:00 वा. जगाला मानवता आणि समतेचा संदेश देणारे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज आणि शुद्रातिशुद्रांच्या हाती शस्त्र देणारेे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविदास छात्रालय हनुमान नगर नागपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि छात्रालयाचे उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बसेशंकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून छात्रालयाचे सचिव श्री दामोदर चंगोले, संघटनेचे शहराध्यक्ष महादेव बिंझाडे, मुख्य सल्लागार राजेंद्र मालखेडे उपस्थित होते.आजचा नियोजित उपवर वधु परिचय मेळावा आणि “रेशीमगाठी” परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा कोविड- १९ कारणाने मनपा नागपूर प्रशासनाने ५०पेक्षा जास्त लोकांना कार्यक्रमात सहभागी होण्यावर बंदी घातल्याने रद्द करण्यात आला आहे.

जयंतीचा कार्यक्रम ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला. संचालन व आभार प्रदर्शन सचिव श्री ज्ञानेश्वर काकडे यांनी केले. कार्यक्रमाला मा. प्रेम (हितेश) मुंदाफळे राष्ट्रीय गठई कामगार महासंघ नागपूर जिल्हा अध्यक्ष, पूर्व विदर्भ अध्यक्ष लिलाधर कानोडे, कार्याध्यक्ष अनिल काटोले, दिगंबर पिंपळकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषा इंगळे, नीता काटोले, चंद्रकला घोडे, तारा बसेशंकर, प्रभाकर राजुरकर, रामदास घोडे, फुलचंद मालाधरी, धनंजय लिपटे, नानाजी शिंगाडे, राजेंद्र काटोले, राजेश सोपानकर, राजकुमार डाहाके, विठ्ठल चरडे, डॉ सुरेश बसेशंकर, सूनील खोब्रागडे, आशिष ठोंबरे, वामन बोडखे, मधुकर चापके, कु. कर्तव्या मुंदाफळे, रमेश धावंडे, महादेव घोडे प्रकाश कुहीकर दिलीप शेंडे, सुनील शेंडे, आशिष वानखेडे, मधुकर इंगळे, अशोक इंगळे इत्यादि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.