नागपूर : हिंदु महिलांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या अरबाज खान या तरूणाला संतप्त शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर सदर पोलिसांनी अटक केली. नागपुरातील सदर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या काटोल रोड, फ्रेण्डस काॅलनी येथील अरबाज खान या तरूणाने हिंदु महिलांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधाने करीत त्याचा व्हीडीओ तयार केला. अल्पावधीतच हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातील अर्वाच्च, शिवीगाळ करणारी आक्षेपार्ह भाषा ऐकून शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त शिवसैनिकांनी सदर पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीला अटक करण्याची मागणी केली
या संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे, शहरप्रमुख नितीन तिवारी, युवासेने चे ज्ञिल्हाथिकारी हितेश यादव यांच्या सह शेकडो शिवसैनिकांनी सदर पोलिस ठाण्यात जावून आरोपीला अटक करण्याची मागणी केली, आम्हाला पोलिस आयुवत्ताशी बोलायचे आहे असा पवित्रा घेतला, पोलिस आयुत्त अमित कुमार यांच्याशी चर्चा करून हिंदुबद्दल आश्लिल शिवीगाळ करणाऱ्या आरोपी ला अटक करज्याची मागणी केली, अमित कुमार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेवून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली.
पोलिस आयुक्तांशी बोलल्याशिवाय आणि आरोपीला अटक झाल्याशिवाय ठाण्यातून हटणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. परिस्थिती पाहून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: सदर पाेलिस ठाण्यात जाऊन शिवसैनिकांची चर्चा केली. त्या नंतर आरोपीला अटक केल्यानंतर शिवसैनिकांनी पोलिस ठाणे सोडले.