- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : अमरावती रोड ते दाभा रिंगरोडपर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे आज भूमिपूजन

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेतर्फे राज्य सरकारकडून प्राप्त विशेष अनुदानातून प्रभाग 12 मध्ये अमरावती रोड ते आंतरराष्ट्रीय कृषी कन्व्हेंशन सेंटर वायुसेना गेट दाभा रिंग रोडपर्यंत बांधण्यात येणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याचे भूमिपूजन माननीय केंद्रीय परिवहन राजमार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते व माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उद्या, (ता. 7) सायंकाळी 5 वाजता वायुसेना चौक, दाभा रोड येथे होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर श्रीमती निता ठाकरे राहणार आहेत.

यावेळी विशेष पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनवर्सन निधी, न्याय व कामगार राज्यमंत्री श्री. ॲड. आशीष जयस्वाल, खासदार श्रीमती मायाताई ईवनाते, आमदार श्री. अभिजीत वंजारी, आमदार श्री. सुधाकर अडबाले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार श्री. कृपाल तुमाने, आमदार श्री. संदीप जोशी, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. विकास ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर, आयुक्त डॉ. विपीन, जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, क्रीडा विशेष समितीच्या सभापती श्रीमती दर्शना धवड, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, एमआयएमचे गटनेते श्री. शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेते श्री. असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेते श्री. किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटनेत्या श्रीमती आभा बिज्जू पांडे, बसपाच्या गटनेत्या श्रीमती हर्षला जयस्वाल, शिवसेना (शिंदे) गटनेते श्री. गणेश चर्लेवार, प्रभाग 12 च्या नगरसेविका श्रीमती साधना बरडे, नगरसेवक श्री. विक्रम ग्वालबंसी उपस्थित राहणार असल्याचे मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार व सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.