- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : लहान राज्याचे पुरुस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या मुख्यालयात अभिवादन

नागपूर समाचार : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुख्य कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समितीच्या वतीने बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी ‘स्वतंत्र विदर्भ’ राज्याचा संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केला.

कार्यक्रमाला संबोधित करताना समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लहान राज्यांचे खंभीर पुरस्कर्ते होते. त्यांनी भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करताना प्रशासकीय सोयीसाठी विदर्भ राज्याचे समर्थन केले होते. भारताच्या संविधानातील ‘आर्टिकल ३’ (Article 3) मध्ये संसदेला नवीन राज्याची निर्मिती करण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे. याच घटनात्मक आणि संवैधानिक मार्गाने केंद्र सरकारने विदर्भाला वेगळे राज्य जाहीर करावे, तरच ती बाबासाहेबांच्या विचारांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल. बाबासाहेबांचे स्वप्न: डॉ. आंबेडकरांनी ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’ या ग्रंथात मांडलेली विदर्भाची संकल्पना पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. 

यां प्रसंगी पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, युवा आघाडी प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनीलभाऊ चोखारे , कोअर कमेटी सदस्य राजेंद्र कानफाडे, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, व्यापारी आघाडी अध्यक्ष रवींद्र भामोडे, नागपूर युवा अध्यक्ष गिरीश तितरमारे, शाहिद अनवर अब्दुल रशीद, जॉय बांगडकर, विजय मोंदेकर, डॉ. गोहर पटेल, बबनराव नान्हे, मल्हार पुरोहित, श्रीधर खेडेकर, अमोल रडके उपस्थित होते.