नागपुर समाचार : श्रीराम नवमी निमित्त स्वरवेद तर्फे मन राम रंगी रंगले भक्ती गीताचां कार्यक्रम आज दिनांक 26 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोम हॉल सेवा सदन च्या बाजूला झाशी राणी चौक नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना श्रीरामाची गीते ऐकायला मिळणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना रवी सातफळे यांची आहे.
कार्यक्रमात गायक अमरीश जोगळेकर, आरती बुटी अस्मिता शिवलकर, दिपाली सप्रे, स्वाती मंडल गीते सादर करतील यांना तबला संगत रवी सातफळे व हार्मोनियम वर विजय येल्लोरे साथ देतील. लघुवाद्यावर आदित्य पेशवे साथ करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उज्वला अंधारे करतील.
कार्यक्रम रसिकांसाठी निशुल्क ठेवण्यात आला आहे असे सोहम चे अध्यक्षा अध्यक्षा सौ वर्षा मनोहर आणि पदाधिकारी श्री मोहन सरवटे यांनी कळविले आहे.




