- Breaking News, धार्मिक , विदर्भ

विदर्भ समाचार : मार्कंडा येथे पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ ; डॉ. अशोकजी नेते यांची उपस्थिती

विदर्भ समाचार : दि.१४ मार्च २०२६ चामोर्शी मंडळाच्या वतीने आयोजित पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६ रामप्रसाद महाराज मठ मार्कडादेव येथील कार्यशाळेला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुचना केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थान येथे मा.खा. डॉ. नेते यांनी विधिवत पूजा-अर्चा करून मनोभावे आरती केली. यानंतर प्रशिक्षण शिबिरातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडावा, तसेच पक्षकार्य अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भेंडारा परिसरात सुरू असलेल्या एमआयडीसी साठीच्या भूमी अधिग्रहणाच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. या संदर्भातील स्थानिक नागरिकांच्या मागण्या आणि समस्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी लवकरच प्रतिनिधीमंडळ घेऊन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मान. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासनही मा.खा. डॉ. नेते यांनी यावेळी दिले

या प्रसंगी प्रशिक्षण स्थळी चामोर्शी मंडळ तालुका अध्यक्षा रोशनीताई वरघंटे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, शहर प्रमुख नरेश अल्सावार, माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजप नेते राजूभाऊ चुधरी, युवा नेते संजय खेडेकर, ज्येष्ठ नेते जयराम चलाख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्यपद्धती, विचारधारा आणि भविष्यातील कार्यक्रमांची दिशा मिळणार असून पक्षकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा

स्थळ : मार्कंडा देवस्थान, चामोर्शी

दि. १४ व १५ मार्च २०२६

पहिला दिवस : १४ मार्च २०२६

सकाळी ०८:३० ते १०:३० – नोंदणी, एकत्रीकरण व चहा-नाश्ता

सकाळी ११:०० – उद्घाटन सत्र (दीपप्रज्वलन, वंदे मातरम् व प्रास्ताविक)

दुपारी १२:१५ ते ०१:१५ – प्रथम सत्र : वैचारिक अधिष्ठान

दुपारी ०१:१५ ते ०२:०० – भोजन सुटी

दुपारी ०२:०० ते ०३:०० – द्वितीय सत्र : इतिहास आणि विकास

दुपारी ०३:१५ ते ०४:१५ – तृतीय सत्र : कार्यकर्त्यांची आमची दृष्टी

सायंकाळी ०४:१५ ते ०४:४५ – चहा पान

सायंकाळी ०५:०० ते ०६:०० – चौथे सत्र : कार्यपद्धती

सायंकाळी ०६:१५ ते ०७:१५ – पाचवे सत्र : सोशल मीडिया

रात्री ०८:०० ते ०९:०० – भोजन

रात्री ०९:०० ते १०:०० – सांस्कृतिक कार्यक्रम

दुसरा दिवस : १५ मार्च २०२६

सकाळी ०५:३० – जागरण

सकाळी ०६:१५ ते ०७:०० – व्यायाम व योगासने

सकाळी ०७:१५ ते ०८:०० – स्नान

सकाळी ०८:०० ते ०९:०० – चहा-नाश्ता

सकाळी ०९:०० ते १०:०० – सहावे सत्र : आगामी कार्यक्रम

सकाळी १०:१५ ते ११:१५ – सातवे सत्र : सरकारी कामगिरी

सकाळी ११:३० ते १२:३० – समारोप सत्र

दुपारी १२:३० – राष्ट्रगीत

दुपारी ०१:०० – भोजन