आमदार समीर कुणावार यांची प्रमुख उपस्थिती
समुद्रपूर समाचार : विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचे कार्यशैलीने प्रभावित होऊन स्थानिक समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव येथील सौ. मीना प्रकाशसिंग छोयले यांचे सह यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश घेतला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, विधानसभा प्रमुख संजय डेहणे, माजी जिल्हा परिषद सदस्य मंदाताई चौधरी, माजी पंचायत समिती उपसभापती योगेश फूसे, ज्येष्ठ नेते रवीभाऊ ठोंबरे, भाजपा नेते मनोज बारसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. समीर कुणावार यांनी मीनाताई छोयले यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांना भाजपाचा शेला देऊन सन्मान करीत त्यांचे जगातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपामध्ये प्रवेश केल्याने स्वागत केले.
पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करीत आ. कुणावार यांनी पक्षाचे ध्येयधोरणांचा समाजात प्रचार करण्याचे आवाहन केले.
यावेळी मीनाताई छोयले यांचे सह सावित्रा चव्हाण, दुर्गा चौधरी, अस्मिता ढोणे, योगिता ननावरे, कलावती श्रीरामे, विमल दडमल, सुनंदा दडमल , रुंदा दडमल , कुसुम चौके, मारुती मसराम, ऋषी नन्नावरे, गुलाब रंधई, प्रदीप दडमल इत्यादी कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत रितसर प्रवेश देण्यात आला.




