- Breaking News, PRESS CONFERENCE, विदर्भ

गडचिरोली समाचार : “गडचिरोलीत औद्योगिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाची नवी क्रांती – प्रवीण दटके

Steel Hub of India कडे ‘Green, Strong & Self-Reliant’ वाटचाल!

गडचिरोली समाचार : आज गडचिरोली येथे केंद्रीय अर्थसंकल्पातून जिल्ह्याला मिळालेल्या निधी व विकास कामांबाबत माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोड मॅप मांडला.

2015–16 पासून सुरू झालेल्या मायनिंग प्रकल्पांमुळे संपूर्ण स्टील इको सिस्टीम उभी राहत आहे. 2025 पर्यंत 14,000 हून अधिक स्थानिकांना रोजगार मिळाला असून इंटिग्रेटेड स्टील प्लांटनंतर आणखी 20,000 रोजगार निर्माण होणार आहेत. महिलांचे सक्षमीकरण, 80 किमी स्लरी पाईप लाईन सह पर्यावरणपूरक प्रकल्प, 1 कोटी वृक्षलागवड, जागतिक दर्जाचे मायनिंग शिक्षण आणि आरोग्य सुविधा या माध्यमातून गडचिरोली चा चेहरा बदलत आहे.

पोलीस दलाच्या शौर्या मुळे जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आला असून पुढील 5–10 वर्षांत गडचिरोलीला महाराष्ट्रातील आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

गडचिरोली आता शेवटचा जिल्हा नाही. तर “Gateway to South India” म्हणून वेगाने पुढे जात आहे. यावेळी पक्षाचे व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.