

भाजपाच्या विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त
नागपुर समाचार : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितिन नवीनजी ज्यावेळी आपल्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारून देशाला संबोधित करत होते, त्याच शुभमुहूर्तावर जामसांवली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात विशेष पूजन आणि आरतीचे आयोजन करण्यात आले.
शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्याहस्ते पूजा करण्यात आली, यावेळी भाविकांना प्रसाद वाटप करून नितिन नवीनजींचा कार्यकाळ यशस्वी व्हावा, यासाठी प्रभू चरणी प्रार्थना करण्यात आली. हनुमानजींच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या उदंड प्रतिसादामुळे माननीय श्री नितिनजी गडकरी, श्री देवेंद्रजी फडणवीस,भाजपाचे सर्व महापौर आणि सर्व आमदारांच्या कार्याला जनतेने मोठा सन्मान दिला आहे,
याच जनप्रतिसादामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयाचे ‘शतक’ पूर्ण झाले असून,या यशाबद्दल देवाचे आभार मानण्यात आले.याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका सौ.प्रमिला गौर, कार्यालय मंत्री ब्रजभूषण शुक्ला, मंत्री अमोल कोल्हे आणि अजय गौर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.





