- Breaking News, मुंबई समाचार

नवी मुंबई समाचार : नवी मुंबईच्या विकासासाठी भाजपा सदैव तत्पर

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ ऐरोली येथे ‘जाहीर सभेत’ उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला.

नवी मुंबई समाचार : नवी मुंबई हे मुंबईचे विस्तारित स्वरूप आहे, हे शहर पुढील आर्थिक विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणार आहे. नवी मुंबईमध्ये सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाणार आहे. या विमानतळामुळे फार्मा, इनोव्हेशन, अन्नप्रक्रिया, सेवा तसेच आयात-निर्यात या सर्व क्षेत्रांमध्ये नवी मुंबई मोठी भरारी घेणार आहे. कळंबोली येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जंक्शन तयार केले जाणार असून, खारघर-तुर्भे बोगदा देखील तयार करत आहोत. यासोबतच सिडकोच्या माध्यमातून मेट्रोचे नेटवर्क तयार होत आहे.   

शिलार आणि पोशीर प्रकल्पाद्वारे येत्या काळात नवी मुंबईमधील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच नवी मुंबई येथे एड्युसिटी उभारणार आहोत, ज्यामुळे जगातील मोठमोठी विद्यापीठे नवी मुंबई येथे येणार आहेत. आता लाखो विद्यार्थी येथेच शिकतील आणि त्यांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होईल. 

घणसोली सिम्प्लेक्समधील घरांचा पुनर्विकास करण्यात येणार असून, एपीएमसी मार्केट त्याच ठिकाणी विकसित केले जाणार आहे. बेलापूरमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात निविदा काढल्या आहेत. तसेच मानपाडा येथे केंद्रीय ग्रंथालयाचे देखील काम सुरू होत आहे. नवी मुंबईमधील आपल्या कोळी बांधवांसाठी आणि भूमिपुत्रांसाठी देखील विविध योजना आणणार आहोत. तसेच नवी मुंबईच्या विकासात कोणालाही अडथळा येऊ देणार नाही.      

नवी मुंबईकरांनी येत्या 15 तारखेला भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. पुढील 5 वर्षे नवी मुंबईच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ.

यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी, मंत्री गणेश नाईकजी, आमदार मंदाताई म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.