- Breaking News, विदर्भ

ठाणे समाचार : आपले ठाणे, आपले भविष्य…

ठाणे समाचार : आज अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि वरिष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ यांनी ठाणे येथे ‘आपलं ठाणे, आपला देवाभाऊ’ ही दिलखुलास मुलाखत घेतली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाण्याच्या विकासाचं व्हिजन ठाणेकरांपर्यंत पोहोचवता आले.

आपल्या खाद्यसंस्कृतीसोबतच, कला-क्रीडा, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत आपले ‘ठाणेपण’ जपणाऱ्या प्रत्येक ठाणेकरांच्या स्वप्नांना पंख देणारे भविष्यसज्ज ठाणे घडवण्याचा आराखडा यावेळी ठाणेकरांसमोर मांडला.

आम्ही जाणतो, ठाण्यासह एमएमआर क्षेत्राचे दोन मुख्य प्रश्न म्हणजे घर आणि प्रवास. यासाठी बांधकामांच्या परवाना पद्धतीमध्ये गती आणण्यासाठी AI सह विविध तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे. यासोबतच मेट्रो, लोकल, ई-बस, रिंग रोड, ट्वीन टनल यांच्या माध्यमातून हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. यातील 200 किमी मेट्रोचे काम पूर्ण झाले असून 2030 पर्यंत मेट्रोचे संपूर्ण जाळे पूर्ण होईल. 

कचऱ्यावर प्रक्रिया, डम्पिंग यार्डचा अंत, काळू-पोशीर-शिलार-गारगाईसारखे पाणीपुरवठा प्रकल्प, हे पुढील 30 वर्षांचा विचार करून घेतलेले निर्णय आहेत. हे पाणीपुरवठा प्रकल्प ठाणेकरांसह मुंबईकरांचीही तहान भागवतील. 

एमएमआर क्षेत्रामध्ये 1.5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी एज्यु सिटी, टेक्नॉलॉजी हब, स्टार्टअप्स निर्मितीसोबतच कौशल्य विकासावर काम सुरू आहे.

आमच्यासाठी विकास म्हणजे फक्त प्रकल्प नाहीत, तर माणसांचे रोजचे आयुष्य सुखकर करण्याचे साधन आहे. 

महाराष्ट्रसेवक म्हणून ठाणेकरांना विश्वास देऊ इच्छितो की आपले ठाणे ‘भविष्यसज्ज’ होत आहे!

या मुलाखती दरम्यान ठाणेकरांचा उत्साह पाहून आनंद वाटला. प्रत्येकाला या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणे शक्य नसल्यामुळे अनेक ठिकाणी स्क्रीन्स लावून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. 

यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.