- Breaking News, नागपुर समाचार

हिंगणा समाचार : हिंगण्यात नगर परिषद – पंचायत मतदान शांततेत… सुमारे 55 टक्के मतदान

वानाडोंगरी, डिगडोह नगरपरिषद व निलडोह नगरपंचायतीत मतदान

हिंगणा समाचार : तालुक्यातील वानाडोंगरी येथे काही केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी वगळता, डिगडोह नगर परिषद व निलडोह नगरपंचायतीसाठी आज (ता.२) मतदान प्रक्रिया सांततेत पार पडली. तिनही ठिकाणी सर्व मतदान केंद्रावर प्रशासनाने मतदानाची जय्यत तयारी केली होती. सर्व ठिकाणी सुमारे ५५ टक्के मतदान झाले. सकाळी ११:३० पर्यंत २०% मतदान झाले होते. दुपारनंतर सलग मतदान झाले मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. वानाडोंगरी नगरपरिषदेत एकूण मतदार संख्या – ४८,२६७ असून पुरुष मतदार संख्या २५,३८३ महिला मतदार संख्या २२,८७९ तर ५ इतर मतदार संख्या नगराध्यपदासाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत.

एकुण प्रभाग संख्या १२ असून नगरसेवक संख्या २४ असून १२६ उमेदवार नगरसेवक पदंसाठी मैदानात आहे. मतदान केंद्र संख्या ५२ असून संवेदनशिल मतदार केंद्र ६ होते. डिगडोह (देवी) नगरपरिषदेत एकूण मतदार संख्या ३३,१८८ असून पुरुष मतदार संख्या १७,५०२, स्त्री मतदार संख्या १५,६८३ व इतर मतदार संख्या ३ आहे.नगराध्यपदासाठी उमेदवार ७ उमेदवार रिंगणात होते. एकुण प्रभाग संख्या १२ असूननगरसेवक संख्या २४ आहे नगरसेवक पदासाठी ८८ उमेदवार आहेत. ३७ मतदान केंद्र होते. नगरपंचायत निलडोहमध्ये एकूण मतदार संख्या ९५३ होती. पुरुष मतदार संख्या ९५७१ तर महिला मतदार संख्या ८३८० इतर मतदार संख्या २ होती. नगराध्यपदासाठी ४ उमेदवार रिंगणात होते. प्रभाग संख्या १७ असून नगरसेवक संख्या १७ आहे. मैदानात ६७उमेदवार होते. २१ मतदान केंद्र होते. तिन्ही ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना तैनात केले होते.

मतदार यादीतील घोळ पुन्हा बघायला मिळाला. अनेक ठिकाणी या प्रभागातील रहिवाश्यांचे दुसऱ्या प्रभागात मतदान गेल्याने वेळेवर त्यांना धावपळ करावी लागली. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा ताफा तैनात केला होता. वानाडोंगरीत बोगस मतदान झाल्याची तक्रारः भाजपच्या बंडखोर उमेदवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परिानंदा पाटील यांनी मुख्याधिकारी राहुल तक्रार दाखल केलेली आहे.

वाना डोंगरी येथील बुथ क्रमांक 11 व 12 वर काही महिला मतदार मतदान करण्यासाठी आले असता उमेदवार वि उमेदवार प्रतिनिधींना त्यांच्यावर शंका न आल्यामुळे त्यांना विचारपूस केली असता त्यांच्याजवळ आधार कार्ड उपलब्ध नव्हते परंतु मतदान कार्ड उपलब्ध होते मात्र बनावट असल्याचा दावा करत विरोधकांनी पोलिसांना प्रचारण केले त्या दोन महिला मतदारांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्या महिला मतदार बोगस आहे किंवा नाही हे आज निष्पन्न झालेले नाही ते चौकशी अंति समोर येईल अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली