- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ये कवी संमेलन हिंदुस्तान बनके सुनना…;हास्य व्यंगासह शाब्दिक कोट्यांनी रंगला खासदार सांस्कृतिक महोत्सव!

नागपूर समाचार : नागपूर .. आप नं मुझे कॉँग्रेस बनके सुनना, ना भाजपा बनके सुनना, ना हिंदू ना मुसलमान बनके सुनना, ये ढाई घंटा बस हिंदुस्तान बनके सुनना या ओळी सादर करून कवि दिनेश बावरा यांनी उपस्थितांची मने जिंकली.

हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’ मध्ये शनिवारी नवव्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात अखिल भारतीय हिंदी कविसंमेलन संपन्न झाले. यात देशभरातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि लोकप्रिय कवि हरिओम पंवार, दिनेश बावरा, इंदोरचे नावाजलेले कवि सुदीप भोला, अंकिता सिंह, तेजनारायण शर्मा व अमन अक्षर यांचा सहभाग होता. कविसंमेलनाचे सूत्र संचालन कवि दिनेश बावरा आणि दयाशंकर तिवारी यांनी केले.

कवींनी सूत्र हाती घेतली आणि राजकारणासह अनेक विषयांवर कोट्या केल्या. कवि दिनेश बावरा म्हणाले की ‘मला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिले यावरून प्रतिभेला संधि द्यायला हवी ही शिकवण इतर पक्षांनी घ्यावी’ असा चिमटा त्यांनी काढला.

गडकरी यांनी अतिशय प्रसिद्ध प्रभात वड्याचा उल्लेख केला विडिओ व्हायरल झाला, त्यावर देखील त्यांनी कोटी केली. ‘ प्रभात वडा’ आता लोक रात्री-आपरात्री देखील शोधत आहे, असे ते म्हणाले.

यानंतर सर्व कवींनी विविध रस आणि व्यंग असलेल्या कविता सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. नागपूर का संतरा सबेरे छिल के खाते है और रात को खोल के पिते है वर खूप टाळ्या वाजल्याआजच्या कार्यक्रमाची सुरवात केंद्रीय मंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, डॉ लोकेन्द्र सिंह, श्रीमती मधुलिका मधुप पांडे, दैनिक भास्कर चे संपादक मणीकांत सोनी, डॉ. नीरज व्यास, डॉ. सागर खादीवाला, डॉ गोविंद प्रसाद उपाध्याय, डॉक्टर सतीशजी लखोटिया या सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून केली.

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.