- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा नागपूर दौरा; महानगर कार्यकारिणीसोबत चर्चा

नागपूर समाचार : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूरच्या प्रवासादरम्यान नागपूर महानगर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीमध्ये प्रामुख्याने येणाऱ्या निवडणुका आणि पदवीधर निवडणुकीच्या नोंदणी अभियानावर मार्गदर्शन करण्यात आले.

चव्हाण यांनी पदवीधर निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी कार्यकारिणीने आगामी काळात अधिक प्रभावी प्रयत्न करावे लागेल, असे सांगितले तसेच नागपूर शहराचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी करीत असल्याने येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीत आधी पेक्षा जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी अधिक प्रयन्त करावे लागेल असे सांगितले. प्रदेश अध्यक्षांचा स्वागत करून महानगर कार्यकारिणीच्या सदस्यांचा परिचय करून देताना शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी पक्षाच्या कार्याचा आतापर्यंतचा सविस्तर आढावा सादर केला.

याप्रसंगी मंचावर भाजप शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी,संघटन मंत्री उपेंद्र जी कोठेकर, माजी आमदार मिलिंद माने,आमदार कृष्णा भाऊ खोपडे, आमदार प्रवीण जी दटके आणि माजी आमदार विकास कुंभारे शहर महामंत्री श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, संदीप जाधव, मनीषाताई धावडे, महानगर सहसंपर्क प्रमुख बाल्या भाऊ बोरकर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.बैठकीचे संचालन श्रीकांत आगलावे यांनी केले.