हिंगणघाट समाचार : आदिवासी समाजाचे महानायक बिरसा मुंडा यांची जयंती आज दि.१५ रोजी भाजपाचे वतीने साजरी करण्यात आली.
विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली. उपरोक्त कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार यांच्यासह भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, भाजपाचे अनुसूचित जमाती प्रदेश महामंत्री नितीन मडावी, जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, भाजपाचे हिंगणघाट ग्रामीण तालुका अध्यक्ष विनोद विटाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रदीप जोशी, सुनील उर्फ पप्पू मोहता, अरुणराव धंदरे, रवि रोहनकर, अमोल खंदार, बंटी वाघमारे, सरपंच सागर भगत, दिव्यकुमार बोरगमवार, रविकांत डोळसकर, शरद गौळकार, प्रतीक धंदरे, निलेश हूलके इत्यादींचा समावेश होता.
या वेळी आ.समिर कुणावार यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे विचार मांडले. बिरसा मुंडा यांचे आदिवासी समाजातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
आ. कुणावार यांनी यावेळी बिरसा मुंडा यांच्या विचारधारेचा प्रसार करण्याचे आवाहन करीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटीत होण्याची आवश्यकता व्यक्त केली.
आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे बिरसा मुंडा आजही प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन आ. समीर कुणावार यांनी केले.




