उमरेड (भिवापूर) समाचार : जिचकार सभागृह, भिवापूर येथे भारतीय जनता पार्टी भिवापूर शहराच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भिवापूर नगरपंचायतवर भाजपाची एकहाती सत्ता आणण्याचा दृढ संकल्प केला व सर्वांनी मिळून एकजुटीने यासाठी काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात औपचारिक प्रवेश करून आपला विश्वास आणि पाठिंबा व्यक्त केला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे, जिल्हा अध्यक्ष रामटेक विभाग मा. श्री. आनंदराव राऊत, माजी आमदार मा. श्री. सुधीरजी पारवे, जिल्हा अध्यक्ष काटोल विभाग मा. श्री. राजीवजी पोतदार, जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी मा. डॉ. प्रीतीताई मानमोडे, तसेच जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा मा. श्री. चेतनजी खडसे, मा. श्री. प्रमोदजी घरडे उपस्थित होते.




