गडचिरोली समाचार : गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दीपावलीच्या शुभप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी भेट देऊन स्नेहपूर्ण सदिच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी आमदार डॉ. नरोटे यांनी डॉ. नेते यांना दीपावली भेट देत शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये उत्सवी वातावरणात सस्नेह संवाद साधला गेला. समाजहित, विकासकार्य आणि जनतेच्या प्रगतीविषयी सकारात्मक चर्चा या भेटीत रंगल्या.
यावेळी नरोटे परिवारासह डॉ. नेते परिवार सुद्धा उपस्थित होता. दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन पारंपरिक उत्साहात दीपोत्सव साजरा केला. आनंद, आत्मीयता आणि आपुलकीने भरलेल्या या भेटीने परस्पर स्नेहबंध अधिक दृढ झाले.
गडचिरोलीच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात ही भेट सदिच्छा, सौहार्द आणि जनसंपर्काचा सुंदर संदेश देणारी ठरली.