- Breaking News, नागपुर समाचार, सम्मानित

नागपूर समाचार : “आरोग्य रत्न” जीरो माईल आयकॉन अवॉर्डने डॉ. उदय बोधनकर सन्मानित

बाल आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल

नागपूर समाचार : जीरो माईल राष्ट्रीय हिंदी साप्ताहिक वृत्तपत्राच्या २० व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने आयोजित “जीरो माईल आयकॉन अवॉर्ड-2025” सोहळ्यात नागपूरचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व कॉमहॅड (COMHAD) चे कार्यकारी संचालक डॉ. उदय बोधनकर यांना “आरोग्य रत्न” सन्मान प्रदान करण्यात आला.

हा भव्य कार्यक्रम नुकताच हॉटेल तुली इंटरनॅशनल (रॉयल कोर्ट), सदर, नागपूर येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र बोराटकर (अध्यक्ष, अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन) होते. या प्रसंगी व्हिजन इंडिया चे इंडिया हेड स्वप्नील राणी नंदकुमार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग तसेच घनश्यामदास कुकरेजा (साधना सहकारी बँक), डॉ. धनश्री हरदास (अध्यक्ष, महिला उद्योजकता समिती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स), संजय अग्रवाल (संयुक्त आयकर आयुक्त, नागपूर), डॉ. विंकी रुघवानी (प्रशासक, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद), किशोर कन्हेरे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) व सीमा प्रदीप कोठारी (संचालिका, करण कोठारी ज्वेलर्स) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सभी अतिथियों का स्वागत जीरो माइल फाउंडेशन के अध्यक्ष डॉ. आनंद शर्मा व संपादिका विद्या शर्मा यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद सलीम यांनी केले, तर आभार प्रदर्शन नेचरोपथी आणि योग थेरपिस्ट डॉ. प्रवीण डबली यांनी केले.

सोहळ्यात डॉ. उदय बोधनकर यांना आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “आरोग्य रत्न – जीरो माईल आयकॉन अवॉर्ड 2025” प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांचे गुरु व ज्येष्ठ डॉक्टर डॉ. रावत विशेष उपस्थित होते आणि त्यांनी डॉ. बोधनकर यांना आशीर्वाद दिले.

या सन्मानाबद्दल डॉ. प्रवीण डबली, नियोग थेरपिस्ट विजय गुप्ते, मोरू चाहंदे, श्याम शेंद्रें तसेच शहरातील अनेक वैद्यकीय तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने डॉ. बोधनकर यांचे अभिनंदन केले.

डॉ. उदय बोधनकर हे एमबीबीएस, एमडी (पेडियाट्रिक्स) सहित अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदव्या व सन्मानांनी गौरवले गेले आहेत. ते कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसएबिलिटी (COMHAD, UK) चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत आणि बाल आरोग्य व नवजात शिशूंच्या आरोग्य क्षेत्रात WHO, UNICEF व भारत सरकार यांच्या सहकार्याने अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांशी जोडले गेले आहेत. 2019 साली यूकेच्या RCPCH संस्थेकडून त्यांना FRCPCH हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला.

नागपूर येथील बोधनकर चिल्ड्रन हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी हजारो बालकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवली आहे.

हा सन्मान डॉ. बोधनकर यांच्या जीवनकार्याची आणि समाजाप्रती त्यांच्या समर्पणाची दखल आहे.