- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : बालपांडे पब्लिक स्कूल, बेसा च्या विद्यार्थिनीने पटकावले द्वितीय पारितोषिक

नागपूर समाचार : श्रीकृष्णा कल्चरल फाऊंडेशन, नागपूर आयोजित आंतरशालेय संगीत व नृत्य स्पर्धेत बालपांडे पब्लिक स्कूल, बेसा येथील विद्यार्थिनी कु. स्वरांशी ताजने हिने आपली उत्कृष्ट कला सादर करत संगीत गटात द्वितीय क्रमांक मिळवला. या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

शाळेच्या संचालिका सौ. वैशाली व मुख्याध्यापिका सौ. प्रिया अतकरे यांनी स्वरांशीचे मनःपूर्वक अभिनंदन केले व तिने अशा मंचांवर भविष्यातही सहभागी होऊन शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे, असे आशीर्वाद दिले. बालपांडे पब्लिक स्कूल आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांची कला जोपासण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.