- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : सेवा पंधरवडा अभियान निमित्त संघर्ष नगर युपीएचसी येथे आरोग्य शिबीर

नागपूर समाचार : देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती हा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधी देशात ‘सेवा पंधरवडा अभियान-२०२५’ म्हणून साजरा केला जात आहे.

या अनुषंगाने रविवारी 21 सप्टेंबर रोजी नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २६ मधील संघर्ष नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाच्या अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

आमदार श्री. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ झाला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, माजी उपमहापौर मनीषाताई कोठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, नेहरूनगर झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन पवाने, संघर्ष नगर च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती चोपकर, नोडल अधिकारी डॉ. अश्विनी वाघे, डॉ. तेजस्वी, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी जुडे, डॉ. अनुष्का सामरकर, एएनएम रजनी भोयर, शेफाली सामकुवर, प्रियांका लोणारे, रश्मी हलणारे, शिवानी ढोरे, तेजस्वी कामडी, दिव्यांनी हरडे, आशा सेविका गायत्री उचितकर, सत्यभामा मेश्राम, शारदा चोपकर, ज्योती मेश्राम, आरती कनोजे, ईश्वरी बोरकर, ज्योती धिरडे, ज्योती गजभिये, नेहा तागडे, पल्लवी मेश्राम, प्रीती तलमेल, रश्मी निकोडे, शुभांगी सारंगपुरे, सुजाता रामटेके , विधाता रामटेके, विशाखा धारगावे, दयावती रामटेके, जीवनकला ढोके, ललिता शाहु, माया उरकुडे, रोशनी गिरीपूजे, मनीष बावनकर आदी उपस्थित होते.

शिबिरामध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्‍या निदानासाठी तपासणी, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्‍या निदानासाठीची तपासणी करण्यात आली. ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन, गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी तपासणी व समुपदेशन, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळज. आदी तपासणी करण्यात आल्या. ह्यावेळी परिसरातील शेकडो महिलांनी शिबीराचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *