नागपुर समाचार : बालपांडे पब्लिक स्कूल, बेसा, नागपूर येथे अलीकडेच विद्यार्थ्यांसाठी बालचिकित्सा आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांची सर्वांगीण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी कुशल डॉक्टर कीटे व त्यांच्या तज्ञांच्या टीमने विद्यार्थ्यांची तपासणी केली.

शरीराची उंची, वजन मोजणी, दात आणि इतर मूलभूत आरोग्य चाचण्या यांचा समावेश होता. तपासणी नंतर पालकांना त्यांच्या मुलांच्या आरोग्य अहवाला-सोबतच आवश्यक सल्लाही देण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रिया यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे आरोग्य हे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा उपक्रमांचे आयोजन शाळेच्या वतीने सातत्याने केले जाते.”

शाळेच्या डायरेक्टर सौ. वैशाली बालपांडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यामध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांनी शिक्षक व आरोग्यतज्ञांच्या टीमचे विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम एक ‘स्वस्थ जीवनशैली’ या दृष्टीने उत्तम उदाहरण ठरेल, असे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्या विषयी जागरूकता निर्माण झाली असून, पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.




