- Breaking News, नागपुर समाचार, राजनीति

नागपुर समाचार : रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकाऱ्यांची मीटिंग व पक्ष प्रवेश सोहळा

नागपूर समाचार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहरातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांची मीटिंग व पक्ष प्रवेश सोहळा सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी पक्ष कार्यालय गणेशपेठ येथे आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी नागपुर चे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन, नागपुर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांचे मार्गदर्शनात प्रदेश संघटन सचिव नूतन रेवतकर यांचे नेतृत्वात राकापा (श.प.) गट व काँग्रेसमधील महिला पदाधिकारी मंजूषा सोनोले, शशिकला भोंगाडे, वर्षा पाटील, नीता सोमकुवर, बबिता मांडवकर, मनीषा तांडी यांनी महिला आयोग अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे हस्ते अजित पवार गटात प्रवेश घेतला. कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांचे सहकार्य लाभले. प्रदेश महासचिव व प्रवक्ते प्रशांत पवार, प्रदेश महासचिव तानाजी वनवे, प्रदेश महिला सचिव सौ. लक्ष्मी सावरकर तसेच शहरातिल सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

👆🏾

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *