नागपूर समाचार : देशाचे आदरणीय यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्त ‘ सेवा पंधरवडा अभियान – २०२५ ‘ च्या अनुषंगाने बुधवार 17 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण नगर वाठोडा रोड येथे भारतीय जनता पार्टी वाठोडा मंडळ च्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात श्री कृष्ण नगर चौक परिसर व हनुमान मंदीर परिसर स्वच्छ करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, नागपूर महानगर महामंत्री मनीषा धावडे, संपर्क प्रमुख नरेंद्र(बाल्या) बोरकर, प्रमोद (गुरुजी) पेंडके, सेवा पंधरवडा संयोजक सुधीर दुबे, सहसंयोजक कपिल वासनिक, शुभम मुंडले, वाठोळा मंडळ अध्यक्ष राजेंद्र गोतमारे, महामंत्री सचिन विटाळकर, सचिन वानखेडे, संजय बल्कि, संपर्क महामंत्री विक्रम खुराना, मंडळ उपाध्यक्ष व मंत्री, महिला आघाडी अध्यक्ष कल्पना सारवे, महामंत्री दुर्गा काळे, सुरेखा मदनकर, चित्रा माकडे, संपर्क प्रमुख सिंधु पराते, सह-प्रमुख चंद्रकला चिकाने, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल मलमकर, महामंत्री संजोग हरडे व सर्व प्रभाग अध्यक्ष, त्यांचे महामंत्री सर्व आघाडी प्रमुख, कार्यकर्ता उपस्थित हते.