वर्धा समाचार : वर्धा येथे रविवारी “दि रिपब्लिकन” या संघटनेने रिपब्लिकन प्रशिक्षण आयोजित केले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डॉ. आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षावर प्रेम करणारे तरुण “दि रिपब्लिकन” या राजकीय संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत आहेत. त्यासाठी गावोगावच्या तरुणांकडून प्रशिक्षणासाठी मागणी येत आहे. नागपूरनंतर, वर्धा येथील रिपब्लिकन प्रशिक्षणासाठी प्रो. डॉ. एन. व्ही. ढोके, हिंगणघाटचे इंजि. नवीन इंदुरकर, आयोजक संघटनेचे प्रमुख हर्षवर्धन ढोके यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी डॉ. एन. व्ही. ढोके म्हणाले, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, गवई किंवा तत्सम पक्षांच्या वृद्धांच्या पाठी तरुणांनी न जाता नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. नसून नवीन नेतृत्वाला पुढे आणावे लागेल. त्यास स्वप्नील कांबळे, सौरभ वनकर या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नेतृत्व समोर पंचवीस ते तीस वर्षं टिकणारे असावे. त्यासाठी नेतृत्व हे तरुण असावे. तरुणच समाजात क्रांती घडवू शकतात. वयस्कर नेत्यांनी मार्गदर्शनाची भूमिका घ्यावी. नेतृत्वासाठी बाशिंग बांधून राहू नये.
हर्षवर्धन ढोके म्हणाले, जो नेता बनला त्याला समाजाचा विसर पडला. त्याचा समाजाला कोणताही फायदा झाला नाही. कोणत्याही नेत्याने समाजासाठी दवाखाने, विद्यापीठ, रोजगारावर काम केले नाही. भाषणे देणे आणि स्वार्थासाठी तडजोड करणे हेच सुरु आहे. त्यामुळे आता बौद्ध समाजाने वृद्ध नेत्यांच्या मागे न लागता तरुण नेतृत्वाला संधी देऊन त्याच्या मागे एकमताने उभे राहायला हवे.
इंजि. नवीन इंदुरकर म्हणाले, हर्षवर्धन ढोके यांना तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. विद्यमान नेत्यांना तरुण कंटाळले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन ढोके यांनीच तरुणांचे नेतृत्व का करू नये.
वर्धेचे रवी ढोके यांनी समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या हर्षवर्धन ढोके यांनी नेतृत्व करावे, असे आवाहन केले. संचालन सौरभ बनकर तर प्रास्ताविक स्वप्नील कांबळे यांनी केले. रिपब्लिकन विचार मंथनला आरती टेम्भूरकर, अरविंद थोरात, प्रफुल गजभिये, संतोष शिवणकर, सुरज वाघमारे.अजय सरोदे. अश्वजीत कांबळे. शुभम खडसे. प्रीतम वाघमारे हर्षल गजभिये, सुवर्णा शेंडे. अनुष्का गायकवाड. साची सुटे. जानवी माहेस्कर. रसिका उईके, गायत्री कोवे. मयुरी पंधराम ईशा नगराळे. महीपाल रामटेके. अजय सोरदे. अंकुश कांबळे, अजय मेहरा आदी तरुण उपस्थित होते.
छायाचित्र ओळी – तरुणांना मार्गदर्शन करताना हर्षवर्धन ढोके