- Breaking News

नागपूर समाचार : शिवसेना आपला दारी –बजरंग नगरात जनतेच्या ज्वलंत समस्या

नागपूर समाचार : मानेवाडा परिसरात “शिवसेना आपला दारी” हा उपक्रम जोमात सुरू आहे. वं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे.

प्रभाग क्रमांक ३२ बजरंग नगरात झालेल्या बैठकीत स्थानिक नागरिकांच्या गंभीर समस्या मांडण्यात आल्या. शिवसेना सामाजिक कार्यकर्ते प्रेम (हितेश) मुंदाफळे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मनपा हनुमान नगर झोन क्र. ३ चे सहआयुक्त नरेंद्र बावनकर यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात असे नमूद करण्यात आले की,

बजरंग नगर, बौधिवृष नगर, कैलाश नगर, ज्ञानेश्वर नगर, सावित्रीबाई फुले नगर, विश्वकर्मा नगर, आदिवासी नगर, कौशल्य नगर, ताज नगर, वेळेकर लेआऊट व कुकडे ले आऊट या भागातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. गल्ली क्र.१ ते १७ मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण न झाल्याने खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. नाल्यांचे खोलीकरण व झाकणांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून डास व जीवजंतुंची उत्पत्ती वाढतच आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने केर कचऱ्याचे ढिगारे व दुर्गंधी चा त्रास नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत.

बजरंग नगरातील उद्यानच गायब झाल्याने लहान मुलं व ज्येष्ठ नागरिक गार्डनपासून आज पर्यंत देखिल वंचितच आहेत.

दक्षिण नागपूरातील लोकांच्या आरोग्याला व सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून त्वरित उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा रोष उफाळून येईल, असा इशारा शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला. राहुल हेडाऊ, प्रवीण इंगोले, सोनू (साहिल) देठे, पंकज इटनकर, मुकेश भंडारी, प्रकाश काळे, श्रीकांत तराळे, अनिल वासनकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित हजर होते. शिवसेनेच्या या उपक्रमामुळे स्थानिक जनतेच्या समस्या थेट समोर येत असून, त्या सोडविण्यासाठी दबाव निर्माण होत आहे. शिवसेना आपला दारी हा उपक्रम घरोघरी राबवित लोकांच्या समस्या जाणून घेत आहे सरकारने आता तरी जागे व्हा आणि ह्या सर्वसमस्याचे पालन करा अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *