- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : आयआयएम नागपूर आणि महा मेट्रो यांच्यात सामंजस्य करार

नागपूर समाचार : भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर (IIM नागपूर) ही देशातील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था असून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) हा भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. या दोन्ही संस्थांमध्ये मोबदला बेंचमार्किंग अभ्यासासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या सामंजस्य करारवर महा मेट्रोच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर(भा.प्र.से.) आणि आयआयएम नागपूरच्या वतीने संचालक डॉ. भीमराय मैत्री यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी महा मेट्रो संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे, आयआयएमचे प्रा.प्रॅक्टिस अनुप कुमार (माजी प्रशासकीय अधिकारी), मुख्य प्रशासनिक अधिकारी ले. कर्नल एम वी अलूर (सेवानिवृत्त) उपस्थित होते.

या करारातून मानवी संसाधन व्यवस्थापनात नवनवीन कल्पना राबवणे आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे याबाबत दोन्ही संस्थांची वचनबद्धता दिसून येते. या अंतर्गत IIM नागपूर, महा मेट्रोच्या विद्यमान मोबदला रचनेचे विश्लेषण करून त्याची तुलना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील तत्सम संस्थांशी करेल.

या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट 

• कर्मचार्यांजचा सहभाग आणि निष्ठा वाढवणे

• गुणी व प्रतिभावान व्यक्तींना महा मेट्रोमध्ये आकर्षित करणे

• महा मेट्रोच्या दीर्घकालीन प्रगतीला चालना देणे.

• महा मेट्रोच्या विद्यमान मोबदला रचनेची समकक्ष संस्थांशी तुलना करणे

• दीर्घकालीन आणि शाश्वत संस्थात्मक वाढीसाठी धोरणात्मक आधार प्रदान करणे

या कराराअंतर्गत आयआयएम नागपूर

• सोयीच्या नमुना पद्धतीचा वापर करून मोबदला बेंचमार्किंग प्रकल्पाची रूपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करेल

• महत्त्वाच्या हितधारकांसोबत फोकस ग्रुप चर्चा आयोजित करून गुणात्मक आणि मात्रात्मक माहितीचे विश्लेषण करेल

• तसेच मोबदला व मान्यता योजना, स्पर्धात्मक लाभ संरचना आणि विद्यमान धोरणांतील तफावत ओळखून कृतीशील शिफारसींसह अंतिम अहवाल सादर करेल.

हा सामंजस्य करार महा मेट्रोच्या मानवी संसाधन क्षमतांना बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याचबरोबर व्यवस्थापन शिक्षण आणि सल्लागार सेवांमध्ये आयआयएम नागपूरच्या नेतृत्व भूमिकेलाही अधोरेखित करतो. हा करार महा मेट्रो आणि आयआयएम नागपूर यांच्यातील सहकार्याचा नवा अध्याय ठरून, मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करेल. या उपक्रमातून महा मेट्रोची संस्था म्हणून दीर्घकालीन प्रगती घडेल आणि आयआयएम नागपूरचे संशोधन व सल्लागार क्षेत्रातील योगदान अधिक दृढ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *