लघु उद्योजकांच्या वस्तूंना मिळाली बाजारपेठ
नागपूर समाचार : साकारदृष्टी सोशल फाऊंडेशन आणि झिरो माईल एक्झिबिशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत काटोल रोड चौक येथील ऑरेंज ग्रीन सेलिब्रेशन हॉल येथे उद्योजक/उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ, हस्तकला व नावीन्यपूर्ण वस्तू, पारंपरिक वस्त्र व दागिने यासह अन्य उपयोगी वस्तूंचे सुमारे 100 वर स्टॉल्स होते. मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांसाठी लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मेळाव्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती याविषयी जनजागृती करण्यात आली.
उद्योजक/उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाला रातुम नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य रमेश चोपडे, साकारदृष्टी सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. वैशाली चोपडे, डॉ. प्रिया मोहोड, जयप्रकाश गुप्ता, डॉ. रुची जैन, श्रुती देशपांडे, अमर खोडे, सुधीर कपूर, दुर्गादास जिचकार, रजनी धोटे, मुकेश मिश्रा, किशोर भागडे, अनिल देव, समृद्धी जमेकर, श्वेता दमकोंडावार, श्वेता ठाकूर, सुवर्णा साबळे, स्वाती साबळे, प्रशांत साबळे, नरेश चोपडे आदी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मान्यवरांनी आयोजनाचे कौतुक केले. उत्सवांच्या दिवसांत नव उद्योजक/उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी साकारदृष्टी सोशल फाऊंडेशनचा हा प्रयत्न उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. अशा आयोजनामुळे नागरिकांनाही एकाच छताखाली सर्व काही मिळण्याची सुविधा उपलब्ध होते. असे आयोजन वारंवार होत राहावे, असेही मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता साकारदृष्टी सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. वैशाली चोपडे, रातुम नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य रमेश चोपडे यांच्यासह आयोजन समिती सदस्य अश्विनी ठोंबरे, प्रिती तायडे, रिंकू इंगोले, विष्णू वाकोडे, प्रियंका चोपडे, नीता चोपडे यांनी सहकार्य केले.