नागपूर समाचार : दि यवतमाळ अर्बन को ऑप बँक लि. यवतमाळ विदर्भ मराठवाडयातील अग्रगण्य बँक असून बँकेचे मुख्य कार्यालय गार्डन रोड एलआयसी चौक यवतमाळ येथे दिनांक १५ ऑगस्ट स्वतंत्रदिनी ध्वजारोहण करण्यात आले व मानवंदना देण्यात आली.
दरवर्षी बँकेच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणीक उपक्रम राबविले जातात, स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन दिनांक १५/०८/२०२५ रोजी इयत्ता १० वी व १२ वी परिक्षेत सन २०२५ मध्ये यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या कर्मचा-यांच्या पाल्याचा सत्कार व कौतुक सोहळा सकाळी ८.०० वा बँकेचे मुख्य कार्यालयात आयोजीत करण्यात आला होता. १०वी व १२वी परिक्षेत यशस्वी झालेले ३० विध्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ नितिनजी खर्चे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे तसेच मा सचालक प्रमोद धुर्वे श्रीमती मिराताई पाटे परिमल देशपांडे महेश सारोळकर तवा संचालक नरेंद्र देशपांडे, अरविंद पाडांरकर मंचावर उपस्थित होते. सुरूवातीला मंचावरील मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून भारत मातेचे पुजन केले यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तु तसेच पालकांना पुष्पगुच्छ देवुन शुभेच्छा देण्यात आल्या.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना डॉ नितिनजी खर्च यांनी शुध्द पर्यावरण, नागरिक कर्तव्य, प्रामाणिकपणे कर भरणे, पंचपरीवर्तण, स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, सामाजिक प्रबोधन बावत संबोधन केले.
या वेळी बँकेचे संचालक, सर्व सहा सरव्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शशांक गौतमे यांनी केले. तर प्रास्ताविक मिलिंद देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन राजेश तुरकर यांनी केले. संतोष भोयर यांनी सामुहीक वदेमातरम गीत म्हणून कार्यक्रमाचे यशस्वीते करीता संपुर्ण अधिकारी व कर्मचारी वर्ग, सेवक, सुरक्षा रक्षक तसेच विद्यार्थी पालक उपस्थित होते.