- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूर ग्रामीण पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान

नागपूर समाचार : स्वातंत्र्यदिनी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात नागपूर ग्रामीण पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उल्लेखनीय कामगिरीसाठी अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण (तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, सावनेर) यांना प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

तसेच वृष्टी जैन, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड, आणि धनाजी जळक, पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी, उमरेड यांना उमरेड पोलीस स्टेशनच्या प्रथम क्रमांकाने निवडीबद्दल गौरविण्यात आले.

याशिवाय पोलीस उपनिरीक्षक रमेश नत्थुजी ताजने (नेमणूक – पोलीस स्टेशन कुही) यांना भारत सरकारकडून जाहीर गुणवत्तापूर्व सेवा पदक मिळाल्याबद्दल तसेच चालक पोलीस हवालदार राजेश नत्थुजी सोनटक्के (मोटर परिवहन विभाग, नागपूर ग्रामीण) यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला लोकसभा सदस्य श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *