सुमारे एक हजार नागरिकांनी घेतला लाभ
नागपूर समाचार : महसूल दिनाचे औचित्य साधून 1 ते 7 ऑगष्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार तहसिल कार्यालय, नागपूर (शहर) अंतर्गत वर्मा ले-आऊट अंबाझरी, पन्नालाल नगर, गिट्टीखदान रोड, सुरेंद्रगड, भवानी माता मंदिर सभागृह, पारडी, वाठोडा आदी ठिकाणी सामान्य नागरिकांना शासकीय योजनेच्या लाभ मिळण्याच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबविण्यात आले.
उक्त शिबिराच्या ठिकाणी आमदार कृष्णाजी खोपडे यांनी भेट दिली. तसेच उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार, नागपूर (शहर) संतोष खांडरे, नायब तहसिलदार, नागपूर (शहर) सौ.अपेक्षा रैच हे उपस्थित होते. या उपक्रमाला अनिल ब्रम्हे, दयाराम कुंभरे, आशितोष रामटेके, वैशाली गोन्नाडे, मंडळ अधिकारी व सर्व तलाठी यांचे सहकार्य लाभले.
सदर शिबिरामध्ये 97 आधार कार्डाचे अद्यावतीकरण, 78 व्यक्तींना उत्पन्न प्रमाणपत्र, 16 व्यक्तींना जात प्रमाणपत्र, अधिवास -22, नॉनक्रिमिलेअर- 4, रहिवासी -44, संगांयो अर्ज-45, शिधापत्रिका-27, मतदार कार्ड-26 भुमी अभिलेख-15, समाज कल्याण-40, आयुष्यमान कार्ड-40, संगांयो डीबीटी-ऑनलाईन-20, ऑफलाईन– 30, वैद्यकीय लाभार्थी -74 याप्रमाणे अर्ज प्राप्त झाले.